Sunday, May 31, 2026
Homeमुंबईलाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रति अर्ज ५० रुपये...

लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रति अर्ज ५० रुपये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत माहिती दिली की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून,निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे.या संदर्भात विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते.अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.लवकरच हा निधी संबंधितांना मिळेल,असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!