Saturday, June 27, 2026
Homeभंडाराअन् वाघ दिसताच रेती तस्करांनी ठोकली धूम..!

अन् वाघ दिसताच रेती तस्करांनी ठोकली धूम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.रेतीतस्करांसोबत मिळून अनेकांचे हात ओले होत असल्यानेच रेती तस्करी फोफावली आहे.अशातच तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले यांना भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार ९ एप्रिल रोजी निलंबित केले आहे.एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊनही रेती तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.त्यातच आज,सोमवार २८ एप्रिलला सकाळच्या सुमारास रेतीचा उपसा करतांना अचानकपणे वाघ उपसा करणाऱ्या तस्करांच्या दिशेने येत असल्याचे निदर्शनास येताच ट्रॅक्टर सोडून जो-तो वाट मिळेल त्या दिशेने धूम ठोकून पळू लागला.सदरची घटना तुमसर तालुक्यातील चांदमारा येथील बावनथडी नदीपात्रातील असून चांदमारा गावाजवळून बावनथडी नदी वाहते.दोन राज्यांची सीमा असलेल्या नदीपात्रात मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रंदिवस अवैध रेतीचा उपसा सुरू आहे.गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे.अशातच आज सोमवारी सकाळच्या सुमारास अवैध रेतीचा उपसा सुरू असतांनाच एका मजुराला नदीपात्राकडे वाघ येत असल्याचे दिसून आला.वाघ दिसताच नदीपात्रात असलेल्या रेती तस्करांची एकच घाबरगुंडी झाली.त्यामुळे बनेल त्या दिशेने पळापळ सुरू झाली. काही रेतीतस्कर मध्यप्रदेशाच्या दिशेने पळाले तर काही महाराष्ट्राच्या दिशेने.रेती तस्करांची संख्याबळ आणि आवाज पाहून वाघाने आता आपलेही काही खरे नाही,म्हणून माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!