Sunday, July 26, 2026
Homeदेसाईगंजअवैध रेतीचा टीप्पर देसाईगंज तहसीलला जमा..! - पॉलिटिकल प्रेशर आणून पळवून नेऊ...

अवैध रेतीचा टीप्पर देसाईगंज तहसीलला जमा..! – पॉलिटिकल प्रेशर आणून पळवून नेऊ नये; चर्चांना उधाण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या आमगाव-सावंगी चौकी परिसरात अवैध रेतीचा टीप्पर आज,रविवार २७ एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास वाहतूक चालान नसल्याने  पकडण्यात आला असून सदरचा टीप्पर देसाईगंज तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदरची कारवाई देसाईगंज महसूल पथकाद्वारे करण्यात आली.
अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्याकरीता जिल्ह्यात सर्वत्र तपासणी चौक्या गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उभारण्यात आल्या आहेत.त्यानुसार रेतीसाठी खाली जाणारे वाहन व रेती भरलेले वाहन चौकीतील अधिकारी, कर्मचारी नोंद घेऊन सर्वत्र तपासणी करीत आहेत. अशातच आज रविवार सकाळच्या सुमारास एम एच ३६ ए ए-२२९९ क्रमांकाचा रेती भरलेला टीप्पर आमगाव-सावंगी चौकी परिसरात आढळून आल्याने देसाईगंज महसूल पथकातील अधिकारी,कर्मचारी यांनी अडवणूक करून वाहतूक चालान बाबत विचारणा केली असता,संबंधित टीप्पर चालकाकडे वाहतूक चालान आढळून आली नसल्याने सदरचा अवैध रेती भरलेला टीप्पर देसाईगंज तहसील कार्यालयात पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.पकडण्यात आलेला टीप्पर कुणाचा? हे अद्याप कळू शकले नाही.आज रविवार असल्याने कार्यालयास सुट्टी असून उद्याला पंचनामा केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.त्यातच आता कुणी पॉलिटिकल प्रेशर आणून पकडलेला अवैध रेतीचा टीप्पर पळवून नेऊ नये,अश्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!