- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-आजकाल प्रेम कुठून फुलून येणार,याचा काही नेम नाही.पूर्वी समोरा-समोर एकमेकांकडे टकमक पाहून, जवळ जाऊन प्रेम व्यक्त केले जात होते.मात्र,आता प्रेम प्रगट होण्याचा ट्रेण्ड बदलला आहे.असो काही कां असेना,पण ‘प्रेम हे प्रेमच असते चिरकाल टिकले तर सेम असते’,नाही तर दि एंड असते.त्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी येथील २२ वर्षीय आशिष चौधरी याची चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथील १९ वर्षीय विद्या कन्नाके या तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली.दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली.त्यानंतर भेटी-गाठी वाढल्या.एका मंदिरात पहिल्यांदाच एकमेकांचे दर्शन झाले.प्रेमसंबंध वाढत गेल्याने प्रेमाच्या आणाभाका घेत विवाह बंधनात अडकण्याचा दोघांनीही निश्चय केला.मात्र,आडकाठी ठरत होती ती जात.त्यामुळे काय करावे? या पेच प्रसंगात दोघेही पडले.अशातच जे होणार ते पाहू,असे म्हणीत मुलीने प्रियकराचे घर गाठले.त्यामुळे दोघांनीही लग्न लावून देण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती नाचनभट्टी यांच्याकडे अर्ज सादर केला.कागदपत्रांची तपासणी करून समितीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोपस्कर पूर्ण करून हिंदू विवाह पद्धतीने दोघांचेही लग्न लावून दिल्याने अखेर प्रेमीयुगुल विवाह बंधनात अडकले.प्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामकृष्ण झाडे, ग्रामपंचायत सदस्य परमानंद चहांदे,सुभाष कोडापे, मच्छिंद्र रामटेके,कवड्डू चौधरी,सुरेश कोल्हे,जयंत नागोसे, श्याम चौधरी,कैलास श्रिरामे,राहुल चौधरी,किरण सावसाकडे,विमल चौधरी तसेच मुलाचे नातेवाईक, तंटामुक्त गाव समितीचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

