उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून नक्षली संघटनांकडून हिंसा,जाळपोळ,हत्या व इतर विवक्षित कृत्ये मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत.मात्र,अशी कृत्ये करण्यात नक्षलवाद्यांना आनंद वाटतो काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.अशातच आता नक्षली हळूहळू समजू लागलेत की,आपण कुणासाठी झटतोय? काय करतोय? त्यामुळे अनेक नक्षलवादी हिंसेचा मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यासाठी आत्मसमर्पण केल्याशिवाय पर्याय नाही.अशातच आता छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ३३ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली असून यातील १७ नक्षलवाद्यांवर शासनाच्या वतीने ४९ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.३३ नक्षलवाद्यांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) तसेच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली आहे.सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी म्हटले की,नक्षलवादी विचारसरणी आता फोल ठरू लागली आहे.नाहक एखाद्याचा बळी घेणे तसेच व स्थानिक आदिवासींवर नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारांमुळे नाराज झालेल्या ३३ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पीपल्स लिबरेशन गोरीला आर्मीच्या कंपनी क्र.१ चा डेप्युटी कमांडर मुचकी जोगा व त्याची पत्नी मुचकी जोगी यांचाही समावेश आहे.
हिंसेचा मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली नक्षली संघटना..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

