Wednesday, April 15, 2026
Homeभंडारानापिकीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा...

नापिकीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र संपता-संपेना..! शेतात राब-राब राबून शरीरावर फाटकं धोंगड घालून कसे-बसे आयुष्य जगून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? या आर्थिक,मानसिक विवंचनेत जाऊन शेतकरी बांधव टोकाचे पाऊल उचलीत असतात.तरीही मुर्दाड प्रशासनास जाग येत नाही.नुकतेच शेतकरी कर्जमाफी बद्दल मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी किमान तीन वर्षे तरी शेतकरी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.अशातच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील ६५ वर्षीय नागेश घनश्याम वाघाये या शेतकऱ्याने रविवारी ३० मार्चला गुढी पाडव्याच्या दिवशीच कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून स्वतःच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.त्यातच आता आणखी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी गावात घरी कुणीही नसल्याचे पाहून राहत्या घरात लाकडी मयालीला नायलॉन दोर बांधून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,शुक्रवार ४ एप्रिलला
उघडकीस आली.५७ वर्षीय हेमराज शंकर वाघ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी हेमराज यांनी खरीप हंगामात त्याने सव्वाएकर शेतात धान पिकांची लागवड केली होती.मात्र खर्चही भरून निघाला नाही.उलट नातलगांकडून घेतलेले कर्ज डोक्यावर बसले. पुन्हा उधारीवर रक्कम घेऊन रब्बी धान पिकांची लागवड केली.मात्र त्या धान पिकालाही रोग लागल्याने पुन्हा कर्ज डोक्यावर वाढले होते.सव्वाएकर शेतीत तो दरवर्षी रब्बी,खरीप असे दोन पिके घेत असे.मात्र नापिकीमुळे तो चिंताग्रस्त होता.शेतीसाठी घेतलेले कर्जाची परतफेड कशी करायची या आर्थिक, मानसिक विवंचनेत तो जगत होता.घटनेच्या दिवशी पत्नी व हेमराज हे दोघेच घरी होते.पत्नी प्रातः विधीसाठी बाहेर गेली होती.ती परत आली असता, हेमराज लाकडी मयालीला गळफास लागलेल्या स्थितीत दिसला.या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.लागलीच पोलीस प्रशासनास याबाबत माहिती मिळताच दिघोरी मोठीचे पोलिस निरीक्षक प्रवीण शिंदे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!