Wednesday, August 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा..

देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-होळी हा सण एक आनंद आणि उत्साहाचा सण आहे.जे प्रेम,मैत्री,आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे.दृष्ट प्रवृत्ती,अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश असतो.अश्या या पावण सणानिमित्य आज,गुरुवार १३ मार्चला देसाईगंज आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रेम आणि उत्साहाने पर्यावरणपूरक रंगोत्सव सोहळा नैसर्गिक रंगनिर्मिती करून साजरा करण्यात आला.या रंगोत्सव सोहळा  कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डी.डी.शिंगाडे,प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका एस.पी.प्रधान,पर्यवेक्षिका डी. व्ही.चौहाण,प्रा.एस.आर.शर्मा,प्रा.व्ही.यु.सयाम,एस.ए. कवासे,कु.जे.ए.लांजेवार,नरेंद्र बरडे ( प्रयोगशाळा सहा.) उपस्थित होते.आजचा हा रंगोस्तव सोहळा महाविद्यालयचे जेष्ठ शिक्षक आर.जी.मस्के यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनातून आणि प्राचार्य डी.डी. शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. या रंगोत्सव सोहळ्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगनिर्मिती करण्यात आली.या नैसर्गिक रंगनिर्मितीसाठी बिट,पालक,सांबार,ब्लॅक बेरी, आंबाडी,मुलतानी मिट्टी,काथ,पळसाची फुले,झेंडूची फुले,कडुनिंबाची पाने,हळद,लिंबू,चुना,तांदूळ पिठ व डाळीचे पिठ आणि दुध वापरण्यात आले.गुलाबी रंग बिटपासून,हिरवा रंग पालक,सांबार आणि कडुनिंबची पाने,केशरी रंग पळसाची फुले,कत्था रंग हळद,चुना, लिंबू,पिवळा रंग हळद,डाळी व तांदळाचे पिठ, जांभळा रंग ब्लॅक बेरी,लाल-गुलाबी रंग लाल आंबाडी पासून तयार करण्यात आले आणि पर्यावरणपूरक रंगांपासून रंगोत्सव साजरा करण्यात आला.या सोहळ्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक वृंद,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंग खेळून रंगोत्सव साजरा केला.प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी समस्त जनतेला आपण सुद्धा पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांनी रंगोत्सव साजरा करावे,असे आवाहन केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!