Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा...

देसाईगंज नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-वारंवार सूचना तसेच नोटीस बजावूनही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मुख्य रहदारीचे राज्य महामार्गावरील देसाईगंज नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.देसाईगंज नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वडसा-ब्रम्हपुरी मुख्य रहदारीचे राज्य महामार्गावरील अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना यापुर्वी डिसेंबर २०२४ मध्ये  अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटीस देण्यात आले होते.परंतू अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढून न टाकल्याने काल १० मार्चला नगर परिषदेद्वारा जेसीबीचे सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले आहे.
देसाईगंज शहराच्या वडसा-ब्रम्हपुरी मुख्य रहदारीचे राज्य महामार्गाचे बाजूला अतिक्रमण करुन अनाधिकृतरित्या इमारत/शेडचे बांधकाम करण्यात आले होते.त्यामुळे मुख्य राज्यमहामार्गावर वाहने तसेच नागरिकांचे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने  नगर परिषदेने मौका चौकशी करून पाहणी केली.त्यामुळे मुख्य रहदारी मार्गाच्या बाजूला अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण स्वतः स्वखर्चाने तीन दिवसाचे आत काढून टाकण्याबाबत नोटीस बजावण्यात आले होते.परंतू अतिक्रमणधारकांनी अद्यापपर्यंत मुख्य रहदारीचे मार्गावर अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण काढून जागा मोकळी केली नसल्याने सदर अतिक्रमणधारकांना अंतीम नोटीस देऊन तिन दिवसाचे आत राज्यमहामार्गावरील अनाधिकृतरित्या केलेले अवैध अतिक्रमण स्वखर्चाने काढून टाकावे. अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२,५३,५४ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १७९ अन्वये कार्यवाही करुन सदरचे अनाधिकृत अवैध बांधकाम नगर परिषद यंत्रणे मार्फत काढून साहित्य जप्त करण्यात येईल व या कामी येणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून दंडाच्या शुल्कासह सक्तीने वसूल करण्यात येईल व यानंतर आपली कोणतीच उजर तक्रार विचारात घेतली जाणार नाही,याची गांभिर्याने नोंद घेण्याबाबत कळविण्यात आले होते.परंतु सदर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्याने नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण निष्काषीत करुन जागा मोकळी करण्यात आली आहे.
सदर अतिक्रमण काढण्याकरीता देसाईगंज मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांचे नेतृत्वात नगर परिषदेच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन विविध जबादाऱ्या सोपवून सदर कार्यवाही पार पाडण्यात आली.यामध्ये कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे,स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार,निशांत घोनमोडे,रचना सहाय्यक कु.दिव्या परतेके,विद्युत अभियंता योगीला निंबार्ते,संगणक अभियंता प्रशांत चिचघरे,कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने,कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन,मानधन कर्मचारी हमीद पठाण,लिपीक मुकेश सोनेकर,रितेश येरणे,दिनकर खेत्रे,सफाई जमादार जवाहर सोनेकर,पाणीपुरवठा अभियंता आशीष गेडाम,लिपीक विनोद मरस्कोल्हे ,सफाई कर्मचारी रवि शेंदरे,शैलेश खांडेकर,अमर शेंडे, अरविद इंदूरकर,लिडींग फायरमन राजू निंबेकर ,फायरमन सुनिल नाकाडे,शिपाई व्यंकट चौधरी, सफाई कामगार राहुल रगडे,अनुराग सारोटे,लक्की बिरहा ईत्यादींनी मोलाची कामगीरी बजावली.
यापुढेही अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे.त्यामुळे रहदारीला अथडळा होईल व नागरीकांना विनाकारण त्रास होईल,अशा सर्व ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण करु नये,असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!