Monday, September 7, 2026
Homeगोंदियारोजगारसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

रोजगारसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-घरकुल बांधकाम मजुरांची हजेरी तयार करून पाठवण्यासाठी घरकुल लाभार्थ्यास १ हजार ६०० रुपये  मागून १ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगारसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडुन बुधवारी अटक केली आहे.गोंदिया तालुक्याच्या  रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम झिलमिली येथे कारवाई करण्यात आली.खुमेश भोजराज वघारे वय २७ वर्षे,ग्रामपंचायत झिलमिली असे लाचखोर रोजगारसेवकाचे आहे. नाव
सिंदीटोला येथील ५७ वर्षीय तक्रारदारास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वर्ष २०२४ मधे घरकुल मंजूर झाले.सप्टेंबर २०२४ मध्ये पहिला हप्ता १५ हजार रुपये व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरा हप्ता ७० हजार रुपयांचा तक्रारदारांच्या पोस्टामधील खात्यात जमा झाले.त्यानंतर तक्रारदारांनी रोजगार सेवक खुमेश वधारे याला घरकुल बांधकामाचे काम करणाऱ्या मजुरांची हजेरी (मस्टर) तयार करून पाठवण्याची विनंती केली.यावर वधारे याने मस्टर तयार करून पाठवून देण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची मागणी केली.यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता वधारे याने तडजोडीअंती पंचासमक्ष एक हजार २०० रुपयांची लाचेची मागणी केली.दरम्यान, पथकाने सापळा लावून वधारे याला त्याच्या घरीच तक्रारदाराकडून एक हजार २०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार,सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,हवालदार संजय बोहरे,मंगेश काहालकर,पोलीस शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे, अशोक कापसे,प्रशांत सोनेवाने,कैलास काटकर, महिला शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक शिपाई अल्फाज शेख यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!