Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेकडून थकीत करधाकांवर थेट कारवाईला सुरुवात; तीन मालमत्तांना टाळे..

देसाईगंज नगर परिषदेकडून थकीत करधाकांवर थेट कारवाईला सुरुवात; तीन मालमत्तांना टाळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने शहरातील थकीत व चालू करधारकांना कर भरण्याची सुचना देण्यात आली होती.त्यानुसार काही मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी कराचा भरणा केलेला आहे.अशातच आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरलेले असतांनाही काही नागरीकांनी अजुनही नगर परिषदेकडे कराचा भरणा केलेला नाही.नगर परिषदेच्या वतीने सर्वात जास्त मालमत्ता व पाणीपट्टी कर थकीत असणाऱ्या एकूण २५ थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असुन यातील आज,मंगळवार ४ मार्चला नगर परिषदेच्या कर विभागाद्वारे एकुण ३ मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे.तसेच पाणीपट्टीकर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
शहरातील नागरिकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने  कर आकारणी करण्यात येते.अशातच सुविधांचा लाभ घेणारे अनेकजण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आल्याने देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांचे मार्गदर्शनात थकीत मालमत्ता व पाणीपट्टीकर वसुलीसाठी शहरात विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.सदर कर वसुली पथकामध्ये कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने, कर व प्रशासकिय अधिकारी प्रफुल हटवार,दिनकर खेत्रे,मुकेश सोनेकर,राहूल रगडे,शितल सोनेकर,योगेंद्र सोनेकर तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता आशिष गेडाम,घनश्याम कांबळे,अमर शेंडे, अनुराग बिरहा,सत्यवान कोडाप इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दोन टक्के प्रति महिन्याप्रमाणे शास्ती👇
थकीत व चालू मालमत्ता कराचा भरणा न केल्यास नळ कनेक्शन बंद,शासकीय कागदपत्रे मिळण्यापासून वंचित,प्रत्येक वार्डातील थकीत करदात्यांवर जप्तीची कारवाई,तसेच कर न भरल्यास दोन टक्के प्रति महिन्याप्रमाणे शास्ती आकारण्यात येणार आहे. थकीत रक्कम जप्ती बाबत नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १५२ ते १५६ नुसार करवाई करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे थकबाकीदारांची नावे कुठलीही पूर्वसूचना न देता डिजिटल फलकावर जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याने थकीत कर धारकांनी वेळीच कराचा भरणा करावा; असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!