Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' नव्या नियमांमुळे लाडक्या बहिणी आणखी होणार कपात.! - आता प्रत्येक महिन्याच्या...

‘या’ नव्या नियमांमुळे लाडक्या बहिणी आणखी होणार कपात.! – आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार योजनेचा हफ्ता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी अनेक महिलांनी अर्ज केला.त्यानुसार शासनाकडून लाभही देण्यात आला.अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.आतापर्यंत साडे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.दरम्यान,सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला दिला जाणार आहे.तर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही.याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाडक्या बहिणींना योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे.मात्र लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याच लाभ मिळणार नाही.ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहे.दरवर्षी जून महिन्यात ई केवायसी करावी लागणार आहे.उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
काय आहेत नवे नियम👇
१.अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही
२.दरवर्षी जून ते जुलै मध्ये ई केवायसी करणे अनिवार्य
३.लाभार्थी हयात आहे की नाही याचीही तपासणी होणार
४.लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार
५.जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!