Sunday, May 3, 2026
Homeमुंबईलाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या लाभासाठी करावी लागणार प्रतीक्षा..

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या लाभासाठी करावी लागणार प्रतीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वकांक्षी आणि महायुती सरकारसाठी लाभदायी योजना ठरली आहे.  लाडकी बहीण योजना विधासभा निवडणुकीसाठी गेमचेंजर म्हणून मानली जात आहे.सुरुवातीला या योजनेचा लाभ सर्वच स्तरातील महिलांनी घेतला.नंतर शासनाच्या वतीने काही शर्ती,अटी व निकष लादले.अश्यातही दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ तसेच निकषात बसत नसलेल्या लाभ घेतांना शासनाच्या निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे.या अंतर्गत लाभार्थी महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात का? याची घरोघरी जाऊन छाननी केली जात आहे. त्यामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थी महिलांना या योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तब्बल २ कोटी ५९ लाख लाभार्थी आहेत.त्यांना दरमहा ३ हजार ८८५ कोटी रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीतून दिली जात आहे.या योजनेतील हजारो महिलांना सरकारच्या इतरही योजनांचा लाभ मिळत आहे.यात संजय गांधी निराधार योजना व नमो शक्ती योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश आहे.पण आता या दोन्ही योजनांसह स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारणाऱ्या महिलांचा आकडा ५ लाख ४० हजारांपर्यंत पोहोचला आहे.महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती.या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.यामुळे अनेक निराधार महिलांना हक्काची मदत मिळाली आहे.पण यात अनेक खोटे लाभार्थीही आढळून येत आहेत.या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेतील पडताळणी सुरू केली आहे.या अंतर्गत पात्र महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे का? किंवा त्या या योजनेतील पूर्ण निकष पूर्ण करतात का? याची पडताळणी केली जाणार आहे.यामुळे ही पडताळणी पूर्ण होईपर्यंत महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही,असे सांगितले जात आहे.या प्रकारामुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!