Saturday, April 18, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची जोरात धडक; चितळ घटनास्थळीच मृत्यू...

अज्ञात वाहनाची जोरात धडक; चितळ घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडताना चितळास अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली.यात गंभीर जखमी झालेल्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावरील पिपळा (डाकबंगला) शिवारात घडली.सदरची घटना काल मंगळवारी  उघडकीस आली.
इसापूर (ता.सावनेर) शिवारातील कन्हान नदीच्या काठी असलेल्या झुडपी जंगलात हरीण आणि चितळांचे वास्तव्य आहे.कळपातील एक चितळ पाणी किंवा खाद्याच्या शोधात वाट भरकटले व ते पिपळा (डाकबंगला) शिवारात गेले.महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.पिपळा (डाकबंगला),ता. सावनेर येथील काही नागरिक रोज सकाळी सदरच्या महामार्गाने फिरायला जातात.यातील काही नागरिकांना संतोष सावरकर,रा.पिपळा (डाकबंगला) यांच्या शेताजवळ रोडवर हा चितळ मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले.त्यामुळे त्यांनी लगेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले,उमेश बावणे,वनरक्षक एस.एच.चोपडे, ए.एच.झोटींग,एस.जी.मेंढे,आशिष खोब्रागडे,बंडू सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृत चितळास दफन करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!