Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीशहिद जवानाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - ...

शहिद जवानाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – राज्य सरकारतर्फे कुटुंबीयांना २ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी-६० कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली.
भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला.मात्र,या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे काल मंगळवारी निधन झाले.त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे २ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलिस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. “महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत,” असे त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) वरील संदेशात स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर ओळख; बोलणे बंद करताच अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप केले व्हायरल.. – आरोपी तरुणास बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या स्नॅपचॅटवर १९ वर्षीय तरुणीशी ओळख झाली.दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान तरुण हा आपल्या नातेसंबंधातीलच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!