- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रस्ता ओलांडताना चितळास अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली.यात गंभीर जखमी झालेल्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावरील पिपळा (डाकबंगला) शिवारात घडली.सदरची घटना काल मंगळवारी उघडकीस आली.
इसापूर (ता.सावनेर) शिवारातील कन्हान नदीच्या काठी असलेल्या झुडपी जंगलात हरीण आणि चितळांचे वास्तव्य आहे.कळपातील एक चितळ पाणी किंवा खाद्याच्या शोधात वाट भरकटले व ते पिपळा (डाकबंगला) शिवारात गेले.महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.पिपळा (डाकबंगला),ता. सावनेर येथील काही नागरिक रोज सकाळी सदरच्या महामार्गाने फिरायला जातात.यातील काही नागरिकांना संतोष सावरकर,रा.पिपळा (डाकबंगला) यांच्या शेताजवळ रोडवर हा चितळ मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले.त्यामुळे त्यांनी लगेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले,उमेश बावणे,वनरक्षक एस.एच.चोपडे, ए.एच.झोटींग,एस.जी.मेंढे,आशिष खोब्रागडे,बंडू सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृत चितळास दफन करण्यात आले.
- Advertisement -

