Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजयंत्रणा पाकिटे घेण्यात व्यस्त..! कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव..

यंत्रणा पाकिटे घेण्यात व्यस्त..! कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे.सीसी रोड,नाली बांधकाम व रस्ता रुंदीकरण आदी कामे आचारसंहिता संपल्यानंतर वेगाने सुरू करण्यात आली आहेत.पण,कामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव आहे.ग्रामीण भागातील विविध पर्यवेक्षीय यंत्रणाही फिरकून पाहत नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे यंत्रणा पाकिटे घेण्यात व्यस्त तर नसावी ना..! अश्या चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे.
सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,रस्ता रुंदीकरण आदी विकासकामे जोमाने सुरू आहेत.निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत ही विकासकामे सुरू होती.परंतु,कोणत्याही विकासकामांच्या ठिकाणी त्या कामाबाबत सविस्तर माहिती दर्शक फलक लावले जात नाहीत.शासन नियमानुसार बांधकामस्थळी माहितीचा फलक लावणे गरजेचे आहे.
रस्ता व इतर कामे करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचे नाव,किती मीटर अंतराचे काम,दोन्ही बाजूंनी किती मीटर रुंदीकरण करण्यात येत आहे? किती लाखांचा निधी मंजूर झाला? कोणत्या फंडातून ते काम आहे तसेच संबंधित देखरेख अभियंत्याचे नाव असलेला फलक जनतेला कळण्यासाठी लावणे गरजेचे आहे. मात्र,फलक न लावल्यामुळे ग्रामीण भागातील जनता या कामांबाबत पूर्णतः अनभिज्ञच आहे.त्यातच संबंधित यंत्रणेसह ग्रामपंचायत पदाधिकारीही जाणून बुजून लोकांना त्याची माहिती होऊ नये; यासाठी अंगाला हळद लावीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना तक्रार करण्यात येणार असल्याची भूमिका सुजाण नागरिकांनी स्पष्ट केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!