नागपूर :-तणावात असलेल्या नागपूर शहरातील पोलीस शिपायाने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २९ जानेवारीला उघडकीस आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.रामचंद्र नानाजी रोहनकर वय ४५ वर्षे असे विष प्राशन केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.माहितीनुसार,काही दिवसांपूर्वीच सदर पोलीस शिपायास बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयास बांधला जात आहे.मृत्यूचे कारण अद्याप पुढे आलेले नसून शवविच्छेनानंतर याबाबत अधिक खुलासा होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.घटनेचा पुढील तपास नागपूर पोलीस प्रशासन करीत आहे.
पोलीस शिपायाची विष प्राशन करून आत्महत्या..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

