Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीडॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांना यंदाचा भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर..

डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांना यंदाचा भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये सर्वात मोठा सन्मान सामाजिक कार्यकर्ते आणि सर्च फाऊंडेशनचे संचालक पद्मश्री डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांना विशेष जीवन गौरव पुरस्काराने येत्या ३ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात राजबाग,लोणी-काळभोर,पुणे येथे होणाऱ्या समारंभात पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर,पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात सव्वा लाख रुपये रोख,सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!