- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-दहावी बारावी बोर्डाची परीक्षा म्हटले की,अभ्यास कमी व टवाळक्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.अशातच ऐन परीक्षा आली की,अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपी करून परीक्षेची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यातच काहीजण परीक्षेत मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा हॉलमध्ये नेऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न करतात.आता अश्या कॉपी बहाद्दर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे परीक्षेत चाप बसावा, यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांनी ती पाळली नाही तर ते दोन वर्षे परीक्षेला बसू शकणार नाहीत.या परीक्षांमध्ये मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावरील बंदी कायम असून एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येणार आहे.यापूर्वी,अशा प्रकरणांमध्ये एका वर्षाच्या बंदीची तरतूद होती.परीक्षेत पारदर्शकता ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीबीएसईने सोशल मीडियावर परीक्षेशी संबंधित अफवा पसरवण्याच्या कृत्यालाही अनुचित साधन नियमांत समाविष्ट केले आहे.एखादा विद्यार्थी अफवा पसरवतांना आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशारा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिला आहे.
- Advertisement -

