नवी दिल्ली :-आपण नेहमी बघतो की,घड्याळाची वेळ ही प्रत्येक देशात वेगवेगळी असते.परदेशात सकाळचे नऊ वाजले असतील तर आपल्याकडे सायंकाळचे सहा वाजलेले असतात.त्याचप्रमाणे आपल्या देशात काही ठिकाणी वेळेचे मानक ठरलेले नसल्याने आता वेळेचे मानक निश्चित करण्यासाठी सरकारने सर्व अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रमाणवेळेचा वापर बंधनकारक करणाऱ्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.ग्राहक मंत्रायलाकडून १४ फेब्रुवारीपर्यंत यावर प्रतिक्रिया मागितल्या आहेत.देशात सगळीकडे एकच वेळ असावी यासाठी हालचाली केल्या जात आहेत. भारतीय प्रमाण वेळ नियम २०२४ चा उद्देश वेळचे मानक निश्चित करण्यासाठी एक कायदा तयार करणे हा आहे.यात कायदेशीर,प्रशासकीय,इमारत, व्यावसायिक आणि अधिकृत कागदपत्रांवर एकमेव वेळेचा संदर्भ म्हणून आयएसटी बंधनकारक केले आहे.वेळेबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार,व्यावसायिक, परिवहन,सार्वजनिक प्रशासन,कायदेशीर करार,आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रात आयएसटी हे प्रमाण वेळेचा संदर्भ म्हणून बंधनकारक असेल.अधिकृत आणि व्यावसायिक उद्देशांमध्ये आयएसटीशिवाय वेळेच्या इतर संदर्भाच्या वापराला बंदी,सरकारी कार्यालय,सार्वजनिक आयएसटीचा संस्थांमध्ये वापर बंधनकारक करणे यांचा समावेश आहे.
आता ठरणार ‘एक देश एक वेळ’…भारतीय प्रमाणवेळेचा वापर बंधनकारक करणाऱ्या नियमांचा मसुदा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

