Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरमुरुमाचे अवैध उत्खनन भोवले; तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड..

मुरुमाचे अवैध उत्खनन भोवले; तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात सध्याच्या घडीला नवीन रेल्वे रुळाचे काम सुरू आहे.सर्वप्रथम रेल्वे रुळाच्या रस्ता बांधकामाकरीता मोठ्या प्रमाणावर मुरुमाची आवश्यकता असते.अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात रेल्वे विभागाने महसूल विभागाची परवानगी न घेता मुरमाचे खोदकाम केले.यातील मुरमाचा रेल्वे लाइनच्या कामात वापर केला असल्याचे महसूल विभागाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर १ कोटी ५१ लाखांचा दंड आकारण्यात आला.मात्र, कंत्राटदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केली.या अपीलमध्येही दोषी आढळल्याने कंत्राटदावर आणखी १० लाखाने दंड वाढविला आहे.आता कंत्राटदाराला १ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
डोंगरगाव रेल्वे परिसरात तिसऱ्या रेल्वे लाइनकरिता काम सुरू आहे.या कामासाठी डहाळा रिटमधील सर्वे नंबर-२४ मधील जागा रेल्वेची असल्याचे कंत्राटदाराने भासवून अवैधरीत्या मुरमाचे खोदकाम केले.येथील मुरूम रेल्वेच्या कामात वापरला.यासंदर्भात डहाळा रिट परिसरातील ग्रामस्थ तसेच छोटु शेख यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केली.या तक्रारीनंतर तहसीलदारांसह अन्य कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. यामध्ये परवानगी न घेता उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले.तहसील प्रशासनाने प्रथम एक कोटी ५१ लाख रुपयांचा दंड आकारला होता.यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर दंडाची रक्कम आणखी वाढली.यामुळे आता कंत्राटदाराला वाढीव दंड भरावा लागणार आहे. याबाबत चर्चाना उत आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!