Tuesday, September 22, 2026
Homeमुंबईअभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी अटकेत; पाच दिवसांची पोलीस कोठडी...

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी अटकेत; पाच दिवसांची पोलीस कोठडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.धारदार चाकूने सहा वार करून संधी साधून चोरटा पळाला होता. त्यामुळे चोराला शोधण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.अशातच हल्ल्यातील आरोपी आज,रविवार १९ जानेवारीला मुंबई पोलिसांच्या हाती लागला असून त्याला ठाणे परिसरातून अटक करण्यात आली आहे.मोहम्मद शहजाद वय ३० वर्षे असून तो बांगलादेशी नागरिकत्वाचा असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलिसी खाक्यानुसार,तो चोरीच्या उद्देशानेच अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसला होता,अशी त्याने कबुली दिली आहे.चोराला ठाणे परिसरातून अटक करून मुंबईत आणल्या नंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलयाने त्याला पुढील तपासाकरीता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडी नुसार आणखी मोठे खुलासे पुढे येऊ शकतात,त्यामुळे सदरची कोठडी देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!