- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- वानरांना हाकलने एका तरूणीस महागात पडले असल्याची घटना साकोली शहरात नुकतीच उघडकीस आली आहे.तरुणीच्या घरावरील छतावर वानरांनी उपद्रव माजविला होता,त्यात तरुणी वानरांना हाकलण्यासाठी छतावर चढली,हाकलतांना तरुणीचा तोल गेल्याने खाली पडून गंभीर दुखापत झालेल्या युवतीचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली शहराच्या शिवाजी वॉर्डात घडली. भाग्यश्री अरुण गजापुरे वय ३० वर्षे,असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
माहितीनुसार,घराच्या छतावर वानरांनी उपद्रव मांडल्याने त्यांना हाकलण्यासाठी भाग्यश्री घराच्या छतावर चढली होती.टीनाच्या शेडवर चढून ती वानरांना हाकलण्याचा प्रयत्न करत असतांना ती खाली पडली.त्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. लगेच तिला साकोली येथील एका खासगी दवाखाण्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. जखम गंभीर असल्यामुळे पाच दिवसात बरेच उपचार करण्यात आले.प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर
दवाखाण्यातून सुट्टी घेऊन घरी आणण्यात आले.परंतु २ जानेवारीच्या रात्री उशिरा अचानक प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.दरम्यानच्या काळात प्रकृती अधिकच ढासळल्याने तिला भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.एक दिवस उपचार केल्यानंतर भाग्यश्रीचे दुर्दैवी निधन झाले.मनमिळावू स्वभावाच्या भाग्यश्रीच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

