- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नायलॉन मांजा किती घातक असते,याची प्रचिती चंद्रपूर शहरात काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.किराणा दुकानात सायकलने जाणाऱ्या तिसऱ्या वर्गातील नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा गळा नायलॉन मांजाने कापला असल्याची घटना चंद्रपूर शहराच्या वृंदावननगर परिसरात काल, रविवारी ५ जानेवारीला सकाळच्या सुमारास घडली. गळा कापलेल्या अवस्थेतच त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये त्वरित नेण्यात आले.वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला.साई जंपलवार वय ९ वर्षे असे मांजाने जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.घडलेल्या घटनेने ‘नायलॉन मांजा’ची घातकता पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. जंपलवार हा वृंदावननगर येथील रहिवासी असून लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरामध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो.काल रविवारी सकाळच्या सुमारास तो सायकलने दुकानात जाण्यासाठी निघाला.काही अंतरावरच अचानक नायलॉन मांजा त्याच्या मानेला चिरून गेला.अचानक गळा कापल्याने त्याला काही सुचेनासे झाले.परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले.तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.या घटनेमुळे ‘नायलॉन मांजा’ची घातकता पुन्हा एकदा पुढे आली आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन कायमस्वरुपी बंदी घालावी; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापला गेला. पण,डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले.पतंग उडविणाऱ्यांनो नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोराने उडवा,पतंग विकत घेता येतो,पण गेलेला जीव परत येत नाही.
- Advertisement -

