Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजसलग दुसऱ्याही दिवशी देसाईगंज फवारा चौकातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात...- नेमके प्रकरण काय?...

सलग दुसऱ्याही दिवशी देसाईगंज फवारा चौकातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात…- नेमके प्रकरण काय? घ्या जाणून….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कित्तेक वर्षांपासून अतिक्रमण धारकांची संख्या दिवसेंदिवस बळावली आहे.केवळ देसाईगंज शहरातच नव्हे तर सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.छोटी-मोठी दुकाने थाटून उदरिर्वाहासाठी जागेवर अतिक्रमण केले जात आहे.अशाच प्रकारचे अतिक्रमण देसाईगंज शहरातील फवारा चौकात झाल्याचे उघड झाले आहे.

देसाईगंज शहरातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील लक्ष्मी लॉज हॉटेल जवळील जमिनीचा पट्टा बहाल करण्यात आला होता.मात्र अनेक वर्षांपासून दिलेल्या जमिनीवर अनेक छोटी-मोठीव्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा हडप केली.जागा हडप केल्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील दिलेल्या जागेचा प्रश्न उद्भवला असल्याने कायदेशीर लढाई करणे तितकेच महत्त्वाचे होते.सर्व प्रकारावरून चतुर्भुज जोशी यांचे वारसदार श्यामसुंदर जोशी यांनी कायदेशीर लढाई करण्यास सुरुवात केली.त्यानुसार श्यामसुंदर जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर न्यायालयात धाव घेतली.नागपुर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने योग्य तो न्याय निर्वाळा देऊन फवारा चौकातिल सर्व अतिक्रमण काढुन टाकण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणाचा तिढा कायमचा सुटला व त्यानुसार ११ फेब्रुवारी पासून आज १२ फेब्रुवारी २०२३ ला सुद्धा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!