Wednesday, July 29, 2026
Homeभंडाराउगीचच कश्याला डोक्याला ताण द्यायचं रे बाबा..! - प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे...

उगीचच कश्याला डोक्याला ताण द्यायचं रे बाबा..! – प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे सर्च करून लिहीत होते उत्तरे.. – तब्बल २२ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-उगीचच डोकं खाजवून कश्याला डोक्याला ताण द्यायचं रे बाबा..! म्हणीत बी.ए.प्रशासकीय प्रथम वर्षाचा योग आणि जीवन विज्ञान शिक्षण या विषयाचा शेवटचा पेपर सुरू असतांना चक्क प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे सर्च करून उत्तरे लिहीत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यापासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात उघडकीस आला.प्रकरणी तब्बल २२ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने सर्वजण अवाक् होऊन एकमेकांकडे टकमक बघू लागलेत.
अधिक माहिती अशी की,मोहाडी तालुक्या पासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात शुक्रवारी २७ डिसेंबरला बी.ए.प्रशासकीय प्रथम वर्षाचा योग आणि जीवन विज्ञान शिक्षण या विषयाचा शेवटचा पेपर सुरू होता.अशातच विद्यापीठाच्या नागपूर येथील भरारी पथकाने विद्यालयात धाड टाकली.धाड टाकताच ‘अपनेही रंग मे रंगणे वाले’ असे दृश्य भरारी पथकास दिसून आले.चक्क परीक्षा खोली क्रमांक-१ मध्ये दोन विद्यार्थी तर खोली क्रमांक-२ मध्ये २० विद्यार्थी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाइलद्वारे सर्च करून उत्तरे लिहीत होते.त्यामुळे एकूण २२ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे.कारवाईदरम्यान सर्व विद्यार्थ्यांजवळ मोबाइल असल्याचे आढळून आल्याने भरारी पथकही आश्चर्यचकित झाले.महत्वाचे म्हणजे,सर्वच्या-सर्वच विद्यार्थ्यांकडे परीक्षे दरम्यान मोबाईल कसे? तेही उत्तरे शोधण्यासाठी..! असा मोठा गहण प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!