Sunday, October 4, 2026
Homeदेसाईगंजपूरबाधित नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच.. - हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी...

पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच.. – हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी भरपाई मिळणार कां? शेतकऱ्यांचा सवाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):देसाईगंज तालुक्यातील
 पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकरी बऱ्याच महिन्यांपासून अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याने आता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी भरपाई मिळणार कां?असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकांची लागवड केली.नद्यांना आलेल्या पुराचे पाणी धानाचे पिकात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर धान पिकांचे नुकसान झाले.असे असले तरी काही पीक जिवंत करण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.त्यातही प्रचंड खर्च आला.एकीकडे नुकसान तर दुसरीकडे उत्पादन खर्च जास्त झाले.त्यामुळे दोन्ही बाजुंनी नुकसानाची झळ पोहचली.परंतु,नुकसानग्रस्त पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याने देसाईगंज तालुक्याच्या परिसरातील शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात राज्याचे मंत्रिमंडळ आले आहे.शेतकऱ्यांना जलद गतीने न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा,कुरुड,आमगाव,विर्शी,सावंगी
परिसरातील वैनगंगा नदीला पावसाळ्यात पुर येऊन पुराचे पाणी शेतात शिरल्याने धान पिकांचे पिक प्रचंड नुकसान झाले.अनेक हेक्टर आर.शेतात धान पिकाची तणस झाली असल्याचे बघायला मिळाले.नदीच्या काठाचे शेजारी असणाऱ्या गावातील शेतीतील धानाचे नुकसानग्रस्त पीक सरसकट घेण्यात आले.तर काही अंतरावरील गावात नाल्याचे लगत असणाऱ्या शेतीतील धान पिकांचा समावेश करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनास सादर केलेल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शेतकऱ्यांच्या याद्यांवर अंमलबजावणी करण्यात आली नाही.याच कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.त्यांची दुसऱ्या यादीची आर्थिक मदत अडली आहे.अशातच पूरग्रस्त शेतकऱ्याचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली नाही.परत सप्टेंबर २०२४ च्या नुकसान भरपाईचा थांगपत्ता दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!