Monday, August 17, 2026
Homeचंद्रपूरहल्लेखोर वाघिणीला पकडण्यात वन विभागास यश.. -शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास...

हल्लेखोर वाघिणीला पकडण्यात वन विभागास यश.. -शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पोंभुर्णा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या घोसरी उपक्षेत्रातील पिपरी देशपांडे,देवाडा बुज, जुनगाव या गावातील शेतशिवारात वाघिणीच्या हल्ल्यांचे सत्र सुरू होते.यात वाघिणीच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले होते.अनेक पाळीव प्राणीही वाघिणीच्या हल्ल्यात ठार झाले होते.एकामागून एक झालेल्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.नागरिक आणि शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून वनविभागाने वाघीणीला जेरबंद करण्यासाठी लाइव्ह कॅमेरे,ट्रॅप कॅमेरे,रॅपिड रिस्पॉन्स युनिट आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर होते.तीन दिवसांपासून वाघिणीच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून होते. अखेर हल्लेखोर वाघीण वनविभागाच्या जाळ्यात अडकली.हल्लेखोर वाघीण जाळ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत घोसरी उपक्षेत्रातील काही गावाजवळ वाघिणीचा वावर आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात वाघिणीचे हल्ले वाढले होते.आठवडाभरात वाघिणीच्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या गावात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघिणीने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.सध्या या भागात कापूस वेचणी व धान मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र,वाघिणीच्या भीतीने शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कापूस वेचणीचे काम बंद ठेवले होते.त्यामुळे वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.वाघिणीचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाची टिम ॲक्शनमोडवर आली होती.घोसरी उपक्षेत्रातील वाघिणीचे वावर असलेल्या गावात ३५ कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होती.बोरघाट जंगलालगत व शेतशिवारात ३ लाइव्ह कॅमेरे,१७ ट्रप कॅमेरे लावण्यात आले.पिपरी देशपांडे,ठाणेवासना माल परिसरात १५ ट्रप कॅमेरे लावण्यात आले होते.तीन दिवसांपासून मॉनीटरींगसाठी रॅपीड रिस्पॉन्स युनिट लक्ष देऊन होते.यासोबतच वाघिणीचे वावर असलेल्या गावात सतर्कतेसाठी वनकर्मचाऱ्यांकडून गस्त घातल्या जात होती.यासोबतच काही शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी संरक्षण देण्यासाठी वनकर्मचारी कार्यरत होते.अखेर वनविभागाच्या प्रयत्नाने हल्लेखोर वाघिणीचा शोध घेऊन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!