Tuesday, August 18, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या दर्शनाने अनेकांची घाबरगुंडी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये...

वाघाच्या दर्शनाने अनेकांची घाबरगुंडी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघ म्हटला की,अनेकांची घाबरगुंडी होत असते.अशातच एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले तर..असाच प्रकार चिमूर तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे.चिमूर तालुक्यातील नेरी परिसरातील अनेक ठिकाणी एकाच दिवशी वाघ दिसल्याने नागरिक भयभीत झाले असून,या परिसरात नेमके किती वाघ आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे? मात्र,वनविभाग सुद्धा तेवढ्याच गतीने ॲक्शन मोडमध्ये असून माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देत वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला.
नेरी परिसरातील खुंटाला पट परिसरात पंढरवानी शेत शिवारात,तर सिरपूर मार्गावरील पहाडीच्या परिसरात वाघाने सायंकाळी साडेपाच वाजता दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली.या ठिकाणी वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच झुंबळ उडविली मात्र वाघ शांततेत झुडपात होता.सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेरी क्षेत्र सहाय्यक रासेकर,वनरक्षक वडझे आणि त्यांची चमू घटनास्थळी दाखल होत वाघाला हुसकावून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.नेरी येथील निखिल पिसे यांच्या शेतशिवरात सुद्धा वाघाचे दर्शन झाल्याने मजुरवर्गात तारांबळ उडाली,त्याचप्रमाणे चिमूर कडे जाणाऱ्या नेरी समोरील शेतशिवारात वाघ ठाण मांडून महिला मजुरांना दिसला.सिरपूर मार्गावरील नाल्याजवळ काही नागरिकांना वाघ दिसला.तर याच मार्गाने समोर वाघ हा चाफले यांच्या शेतात दिसल्याने कापूस वेचणाऱ्या महिलांची घाबरगुंडी उडाली,त्यांनी आरडाओरडा करून वाघाला हाकलून लावले.त्यामुळे या परिसरात नेमके किती वाघ आहेत; असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!