Wednesday, August 19, 2026
Homeमुंबईमंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात करा किंवा मुंबईत करा; मात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करणार?...

मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात करा किंवा मुंबईत करा; मात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करणार? ते सांगा- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत, सोयाबीनला भाव नाही,कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार,अशी घोषणा महायुतीने केली होती.त्यामुळे आम्ही आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची वाट पाहत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात राज्य कर्जमुक्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात करा किंवा मुंबईत करा. मात्र,तुम्हाला बहुमत दिले आहे.त्यामुळे सोयाबीनला भाव कधी देणार? कापसाला भाव कधी देणार? आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करणार? याचे उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे; असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आरोग्य विभागाचा राज्यात भट्टाभोळ झाला आहे. बोगस औषधी,बोगस खरेदी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.आता नवे सरकार किती स्वच्छ कारभार करते,ते आम्ही पाहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे.मात्र,तुम्ही शंभरची नोट खा किंवा पाचशेची नोट खा,किमान लोकांना मूलभूत गरजा आहेत त्या तरी पूरावा,असे आवाहन देखील त्यांनी केले.हिंगोलीमध्ये ओल्या बाळांतीनी,शास्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ आली आहे.त्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.हे सरकार केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीच आले का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांची कर्ज मुक्तीची घोषणा करण्याची अपेक्षा असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.कापसाला दहा हजार रुपये भाव द्या, सोयाबीनला किमान हमीभाव द्या, अशी आमची मागणी असणार आहे.तसेच आरोग्य यंत्रणा जी विस्कळीत झाली आहे; त्या यंत्रणाचा बट्ट्याबोळ झाली आहे.त्यामुळे मंत्र्यासह सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!