Wednesday, August 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसलग पाचवेळा यूपीएससी परीक्षेत नापास; पण शेवटच्या प्रयत्नात आयएएस अधिकारी..

सलग पाचवेळा यूपीएससी परीक्षेत नापास; पण शेवटच्या प्रयत्नात आयएएस अधिकारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मनात जिद्द,चिकाटी,मेहनत आणि सातत्य असेल तर कुठलीही अशक्य असणारी गोष्ट शक्य करता येते.अपयशाने खचून न जाणाराच नेहमी यशस्वी होतो; हे आपण अनेकदा ऐकले आहे.याची बरीच उदाहरणे आपल्याला आजवर बघायला मिळाली आहेत.यापैकीच एक उदाहरण म्हणजे आयएएस(इंडीयन सिव्हील सर्व्हिसेस/भारतीय प्रशासकीय सेवा) प्रियंका गोयल यांचे.सलग पाच वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.अखेर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
प्रियंका गोयल या मूळ दिल्लीच्या रहिवाशी आहेत. त्यांचे १२वी पर्यंतचे शिक्षण पीतमपुरा येथील शाळेतून झाले.त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी लगेच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
प्रियंका गोयल यांनी एकूण सहा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली.पण यापैकी पहिल्या पाच प्रयत्नात त्यांना अपयश आले.त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.त्यांनी २०२२ मध्ये २९२ गुणांसह यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांनी देशभरातून ३६९ वा रँक मिळवला.प्रियंका गोयल यांनी ज्यावेळी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली, त्यावेळी त्यांना या परीक्षेची संपूर्ण माहिती नव्हती. तेव्हा त्यांना पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात फक्त ०.७ गुणांनी त्यांना अपयश आले.पुढे तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नातही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. २०२२ मध्ये त्यांनी सहाव्यांदा परीक्षा दिली.हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता.अखेर सहाव्या प्रयत्नात त्यांना यश आले.सोशल मीडियावर प्रियंका गोयल यांचा मोठा चाहतावर्ग आहे.इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.त्या अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात.प्रियंका गोयल यूपीएससीच्या परीक्षेत अनेकदा नापास झाल्या; मात्र, त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले.अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी यूपीएससीसारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!