Wednesday, August 19, 2026
Homeचंद्रपूरसाहित्यांची चोरी करणे गुन्हाच; चोरी करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे- कवी अजय राऊत

साहित्यांची चोरी करणे गुन्हाच; चोरी करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे- कवी अजय राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-साहित्य चोरी हा एक सामाजिक गुन्हाच असल्याचे असे मत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कवठी येथील मुळ रहिवाशी असलेले सुपरिचित कवी अजय राऊत यांनी व्यक्त केले.
साहित्य लेखन हे आपल्या लेखणीतून स्वतःच्या मनाने लिहिलेले लेखन असते.सरस्वतीचे वरदान आणि ते चोरले की सरस्वतीचे अपमान..! आजकाल अनेकजण ऑनलाईनच्या माध्यमातून कविता वाचतात आणि लिहायला सुद्धा शिकतात.पण असेही काहीजण आहेत की,ते कविता वाचून मूळ कवीचा नाव वगळून त्यात आपले नाव टाकून आपलीच पोळी शेकत असतात.हे कुथे तरी थांबायला पाहिजे.या अश्या चोरट्यांना कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
वारंवार तुम्ही चुकले तरी पुन्हा लिहिण्याची संधी घ्या, संधीचे सोने करून दाखवावे.साहित्य चोरणाऱ्यांना विनाशकारी विपरीत बुद्धीच म्हणावे लागेल.
साहित्य लेखन करतांना मन लावून वेळात वेळ काढून साहित्यिक लिहितो,पडताळून बघतो,तेव्हाच त्याला समाधान मिळत असते. साहित्याला प्रोत्साहन,उत्तम दाद मिळाला की,साहित्यिकांचा आनंद द्विगुणित होत असतो.परंतु तेच साहित्य कुणी चोरले की,ते त्यांच्या नावाने प्रसिद्धी मिळवितात.त्या वेळेला मूळ लिखाण करणाऱ्यांचे अंतःकरण खूप दुखावले जाते.एखाद्या किंमती वस्तूचीच चोरी झाले तर आपणांस कसे वाटत असते,चोरी करणाऱ्याला काही वाटत नाही.उघडकीस आले की,क्षमा मागून मोकळे होतात.ही समज चुकीची आहे.त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.भावनांचा विचार नक्कीच करावा.साहित्य चोरी हा एक सामाजिक गुन्हा आहे आणि त्यांचा सुळसुळाट वाढला आहे.काहीजण खोटे सन्मानपत्र,खोटी प्रसिद्धी मिळवितात.कितीतरी महान साहित्यिक आहेत; त्यांचे,साहित्य वाचन मनन करा..! आपोआप तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि साहित्य चोरण्याची गरज पडणार नाही; असा संकल्प करावा.स्वतः लिहिलेल्या शब्दात,वाक्यात,काव्यात,साहित्यात खूप समाधान मिळेल.चुकले तरी दुरुस्त करण्याची ओढ आपोआप निर्माण होते.फक्त तसा प्रयत्न करावा; अशी अपेक्षा देखील साहित्य कला मंच तथा साहित्य माझे जीवन समूहाचे संस्थापक अजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!