- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.विजयी उमेदवार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत,तर पराभूत उमेदवार आपापल्या कामाला लागले आहेत.दोन्ही उमेदवारांकडे निवडणुकीदरम्यान रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते मात्र सध्या वाऱ्यावर असून,जिंकलेले कार्यकर्ते सध्या खुशीत असून हारलेल्या नेत्यांचे कार्यकर्त्यांनी आता रोजगारासाठी शोधाशोध सुरू केली आहे.कार्यकर्ते कामाच्या शोधात फिरत असल्याने महिनाभर गजबजलेले चौक आता ओस पडू लागले आहेत. महिनाभर विविध पक्षांचे झेंडे घेऊन कार्यकर्ते साऱ्या मतदारसंघात रात्रंदिवस फिरले.आपल्या उमेदवारांचा जयजयकार केला. सकाळी उठून प्रचार फेऱ्या आणि पदयात्रांसाठी सज्ज राहणारे कार्यकर्ते निवडणूक संपताच रिकामे झाले आहेत.
निवडून आलेले उमेदवार व पराभूत झालेल्या उमेदवारांनी धाकधूक संपल्याने आता त्यांनी काम संपताच झेंडे घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे.निवडणुकीच्या कालावधीत सलग महिनाभर चहा नाश्ता ते जेवण व सायंकाळी दिवसभराचे मानधन व अन्य सुविधा उपलब्ध असल्याने या कार्यकर्त्यांना महिनाभर कामाची गरज पडली नाही.निवडणूक संपली आणि या कार्यकर्त्यांची गरजही संपली.त्यामुळे त्यांना काम शोधण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
गजबजलेल्या चौकात महिनाभर विविध पक्षांचे कार्यकर्ते चौकाचौकांत एकत्र येऊन पुढील नियोजन करत होते.त्याचबरोबर रात्री प्रचार संपल्यानंतर दिवसभराच्या कामांचीही चर्चा चौकाचौकात करीत होते.त्यामुळे सर्वच चौक सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध पक्षांच्या कार्यकत्यांनी गजबजून जात होते.निवडणुका पार पडताच कार्यकर्ते कामाच्या शोधात फिरत असल्याने चौकाचौकांत शुकशुकाट पसरला आहे.अनेकांच्या हाती काम लागले आहे, तर काहींच्या हाती अद्यापही काम मिळाले नसल्याने आता त्यांची चिंता वाढली आहे.
- Advertisement -

