Tuesday, September 8, 2026
Homeकुरखेडाउत्पादन खर्च वाढला,मात्र भाववाढ झालेली नाही.. -धानाला उत्पादन खर्च अनुरूप योग्य भाव...

उत्पादन खर्च वाढला,मात्र भाववाढ झालेली नाही.. -धानाला उत्पादन खर्च अनुरूप योग्य भाव मिळण्याची गरज- आमदार रामदास मसराम – खेडेगांव येथील धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-मागील काही वर्षांमध्ये बि- बियाने,रासायनिक खते,औषधे तसेच मजूरीचे दर वाढल्याने धानाचा उत्पादन खर्च वाढलेला दिसून येतो आहे.मात्र,त्या तुलनेत धानाची भाववाढ झालेली नाही; त्यामुळे धान शेती परवडत नाही व शेतकऱ्यांना शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागते.धानाला उत्पादन खर्चाच्या अनुरूप योग्य भाव मिळाल्यास शेतकरी स्वतः सक्षम बनून परावलंबी राहणार नाही. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी केले.कुरखेडा तालुक्याच्या खेडेगांव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले,कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे,कुरखेडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जिवन पाटील नाट,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी,आविका संस्थेचे सभापती राजीराम पूराम,उपसभापति देविदास बंसोड,संचालक लोकचंद दरवडे,शंकर पाटनकर,शिवचरण मडावी,नामदेव दर्रो,टून्नू दर्रो,केवळराम जमदाळ,अंताराम कूमोटी, शशीकला जमदाळ,तूळजाबाई गोटा संस्थेचे व्यवस्थापक देवराव खंडारकर,तूकाराम डोंगरवार, विश्वनाथ मेश्राम,मधूकर डोगंरवार,उपसरपंच भूमेश्वर सोनवाने पोलीस पाटील परसराम नाट,टेमनशहा सयाम,दिलीप दर्रो,नरेश मडावी,होमराज कवडो तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी पुढे मार्गदर्शन करतांना आमदार मसराम यांनी सांगीतले की,शासकीय धान खरेदी केंद्र सूरू होण्यापूर्वी दरवर्षी विलंब होत असल्याने गरजू शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना धान विकतो.येथे हमीभावापेक्षा दर कमी राहत असल्याने त्यांचे नूकसान होते.त्यामुळे यापुढे वेळेवर शासकीय धान खरेदी केंद्र सूरू व्हावे म्हणून शाशनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्यानचंद सहारे यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!