Saturday, September 5, 2026
Homeभंडाराअफरातफर केली तिघांनी; मात्र रक्कम वसुल होणार माजी सरपंचाकडून.. - ग्रामसेवक,उपसरपंच यांचे...

अफरातफर केली तिघांनी; मात्र रक्कम वसुल होणार माजी सरपंचाकडून.. – ग्रामसेवक,उपसरपंच यांचे निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हरदोली (झंझाळ) येथील माजी सरपंच अंजिरा झंझाड, उपसरपंच बळवंत झंझाड व ग्रामसेवक ए.एन.माटे यांनी ग्रामपंचायतीमधील रकमेची अफरातफर
 केल्याचे लेखापरीक्षणामध्ये सिद्ध झाले.त्यामुळे त्यांच्याकडून अफरातफरीची रक्कम वसूल करण्यात यावी; असे पत्र जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी व तत्कालीन सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.
ग्रामसेवक माटे व उपसरपंच बळवंत झंझाड यांचे निधन झाल्याने त्यांच्या हिश्श्याची रक्कम माजी सरपंच अंजीरा झंझाड यांच्याकडून वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केली आहे. हरदोली ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक ए. एन.माटे असतांना अंजिरा झंझाड सरपंच होत्या तर बळवंत झंझाड उपसरपंच होते.सन २०००-०१ ते २००६-०७ मधील लेखांचे लेखापरीक्षकामार्फत लेखापरीक्षण करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायतीच्या रकमेची अफरातफर झाली असल्याचे निष्पन्न झाले.निनावी नोंदविलेल्या खर्चात १ लाख ९५ हजार ३१ रुपये अफरातफर झाल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले आहे.
सदर अफरातफर १ लाख ९५ हजार ३१ रुपयांपैकी मोहाडीचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार ग्रामसेवक ए.एन.माटे १ लाख २० हजार ९१ रुपये,उपसरपंच बळवंत झंझाड ३३ हजार १८५ रुपये,सरपंच अंजिरा झंझाड २३ हजार ४७० रुपये याप्रमाणे तिघांहीकडून अफरातफरीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या विषयाला धरून तत्कालीन सरपंचांना सुनावणीसाठी जिल्हा परिषदेला बोलाविण्यात आले होते.या अफरातफरीच्या प्रकरणातील ग्रामसेवक माटे व उपसरपंच बळवंत झंझाड यांचे निधन झाले.त्यांच्या हिश्श्याला आलेली अफरातफरीची रक्कम तत्कालीन सरपंच अंजिरा सुखदेव झंझाड यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे.
अशी होणार वसुली👇
 
ग्रामसेवक ए.एन.माटे- १ लाख २० हजार ९१ रुपये
सरपंच अंजिरा झंझाड- २३ हजार ४७० रुपये
उपसरपंच बळवंत झंझाड- ३३ हजार १८५ रुपये
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!