Saturday, April 18, 2026
Homeगोंदियादुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देताच ग्रामसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू...

दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देताच ग्रामसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक ग्रामसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल,गुरुवारी ७ नोव्हेंबरच्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव मार्गावरील कारंजा येथील हरिओम कॉलनी जवळ घडली.रंजन भैयालाल नेवारे वय ५२ वर्षे असे अपघातात ठार झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत पाथरी,सोनेगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रंजन नेवारे हे काल गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीने गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार तपासणी नाका येथे कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यास निघाले होते.
दरम्यान गोंदिया-गोरेगाव मार्गावरील हरिओम कॉलनी जवळ त्यांच्या दुचाकीला कार क्रमांक एमएच ४९, एएस ०९१७ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!