Friday, May 1, 2026
Homeभंडारा२३ वर्षीय युवकाने वैनगंगा नदीत घेतली उडी; उडी घेण्यापूर्वी आत्महत्या करीत असल्याचे...

२३ वर्षीय युवकाने वैनगंगा नदीत घेतली उडी; उडी घेण्यापूर्वी आत्महत्या करीत असल्याचे वडिलांना केला फोन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-मित्राची दुचाकी घेऊन गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाने वडिलांना आत्महत्या करीत असल्याचे भ्रमणध्वनीवर सांगून कारधा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.सदरची घटना काल,रविवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

निखिल अशोक चिवतकर वय २३ वर्षे, बाम्पेवाडा,ता. साकोली असे मृत युवकाचे नाव आहे.रविवारी दुपारच्या सुमारास एका मित्राची दुचाकी घेऊन भंडाऱ्याला आला.त्याने वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर गेल्यानंतर आपल्या वडिलांना मी वैनगंगा नदीत आत्महत्या करत आहे; असे भ्रमणध्वनीद्वारे कळविले.त्यानंतर लगेच पुलावर मोबाईल ठेऊन नदीत उडी घेतली.

वडिलांनी लगेच त्याच्या फोनवर फोन करण्याचा प्रयत्न केला.मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तिथे असलेल्या लोकांनी कॉल रिसिव्ह करून त्याने उडी घेतल्याचे सांगितले.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती पोलिस विभागाला मिळताच कारधा पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन गोताखोराच्या मदतीने निखिल याचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली.परंतु संध्याकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही.त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.निखिल याला मानसिक आजार असून औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.अधिक तपास कारधा पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!