उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- जमिनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतूनच प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या महेश विजयकुमार दखने वय ३६ वर्षे,रा.छोटा गोंदिया यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला करून ९ जून रोजी खून करणाऱ्या चारही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.१८ जूनपर्यंत आणखी त्यांचा मुक्काम वाढला आहे.घटनाक्रम जाणून घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी न्यायालयाला पोलिस कोठडी वाढविण्याची विनंती न केली.न्यायालयाने त्या चारही आरोपींची पोलिस कोठडी वाढविली आहे.
अटक झाल्यानंतर आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा तुकाराम कापसे वय ४८ वर्षे,रा.शिवमंदिर,आंबाटोली,फुलचूर गोंदिया,सुरेंद्र हरिदास मटाले वय ३२ वर्षे,रा.शिवणी / इंदिरानगर,चिरचाळबांध,ता.आमगाव, मोरेश्वर चैतराम मटाले २६ वर्षे,रा.मोहगाव,सुपलीपार, ता.आमगाव व नरेश नारायण तरोणे ३८ वर्षे,रा.आर.टी.ओ. ऑफिसजवळ,गोंदिया या आरोपींना न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.शनिवारी त्या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

