Thursday, October 22, 2026
Homeभंडारा१६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा ऑटोरिक्षा खाली दबून मृत्यू….

१६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा ऑटोरिक्षा खाली दबून मृत्यू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- जिल्ह्याच्या तुमसर शहरातील दाट लोकवस्तीतील संकिर्ण काँक्रिट रत्यावरील ब्रेकरचा अंदाज चुकून ऑटोरिक्षा उलटून; त्यात अवघ्या १६ महिन्यांच्या निरागस चिमुकल्याचा दबून मृत्यू झाल्याची घटना काल १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.हा धक्कादायक अपघात तुमसर शहरातील विवेकानंद नगरात घडला. रेहान रहमत शाह,असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

शाह परिवार घटनेच्या दिवशी कार्यक्रमाकरिता शहर वॉर्डातून ऑटो क्रमांक एम एच ४९ बीके ६९४२ ने येथे तिरोडी निघाले होते.त्यावेळी रहमत स्वतः ऑटो चालवत होता. तर चिमुकल्या रेहानला कुशीत घेऊन आई व दोन मुले मागे बसले होते.मिळालेल्या माहितीनुसार ऑटो ब्रेकरजवळ येताच रहमतने ब्रेक दाबला त्यावेळी ऑटोचे संतुलन बिघडले त्यातच आईच्या हातातून रेहान रस्त्यावर पडला व ऑटोने पलटी घेतली.त्यात निरागस रेहानच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.डोळ्यापुढे आपल्या बाळाला दगावल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!