Sunday, July 12, 2026
Homeभंडारासार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणे तरुणास पडले महागात-तरुणावर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणे तरुणास पडले महागात-तरुणावर गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- पवनी येथील दिवानघाटावर गांजा सेवन करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला रंगेहात पकडून गुन्हा दाखल करण्यात आला.कृपाल श्यामराव कामथे रा.विठ्ठल गुजरी वॉर्ड पवनी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत असे की,पवनी येथे सार्वजनिक ठिकाणी गांजांचे सेवन होत असल्याच्या तक्रारी होत्या.पवनीचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे हे आपल्या चमूसह गस्तीवर असताना दिवानघाट येथे कृपाल कामथे हा मातीच्या चिलममध्ये गांजा भरून सेवन करताना दिसून आला.त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी एक मातीची चिलम,आगपेटी,एक सुती कापडाचा लहान तुकडा,मातीच्या चिलममधील जळालेली भुकटी आढळून आले.सदर साहित्य पंचासमक्ष सीलबंद करण्यात आले. जप्ती पत्रकाप्रमाणे कृपाल कामथे याचे वैद्यकीय प्रशिक्षण करून रक्ताचे नमुने प्राप्त करण्यात आले.पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे यांची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून पवनी पोलिसांनी कृपाल कामथे याच्याविरुद्ध एनडीपीसच्या कलम २७,२९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.तपास सहायक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!