Thursday, July 16, 2026
Homeनागपूरसख्ख्या भावानेच केला बहिणीवर अत्याचार; अल्पवयीन बहीण गर्भवती.. - न्यायालयाने दिली गर्भपाताची...

सख्ख्या भावानेच केला बहिणीवर अत्याचार; अल्पवयीन बहीण गर्भवती.. – न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील एका गावात सोमवार,२३ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली होती.चक्क अल्पवयीन भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याने यातून गर्भधारणा झालेल्या पिडीत अल्पवयीन मुलीला आज,शुक्रवार २७ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. यातील पीडित १३ वर्षीय मुलगी आणि आरोपी १६ वर्षीय मुलगा हे दोघेही बहीण-भाऊ असून शिक्षण घेत आहेत.ती कळमेश्वर येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने गेल्या वर्षभरात लैंगिक अत्याचार केले होते.विशेष म्हणजे,तो मोबाईलवर अश्लील सामग्री पाहायचा व लैंगिक अत्याचार करायचा.यातून ती गर्भवती झाली.अचानक तिची तब्येत बिघडल्याने तिला दवाखान्यात नेले असता, गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले.विश्वासात घेतल्यावर मुलीने आपल्या सख्ख्या भावाकडूनच अत्याचार झाल्याचे सांगितले.पीडितेला सुरुवातीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते,त्यानंतर तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.सध्या ती २६ आठवड्यांची गर्भवती असून,तिने वैद्यकीय गर्भपातासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली होती.तिच्या वडिलांनी तिच्यावतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.न्यायालयाच्या निर्देशानुसार,तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले.या मंडळाने पीडितेची तपासणी केली.तपासणीत गर्भाची स्थिती,मुलीची २६ आठवड्यांच्या गर्भपातासाठी शारीरिक क्षमता आणि संभाव्य वैद्यकीय गुंतागुंत यांचा अभ्यास करण्यात आला.मंडळाच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली आहे.प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून,१६ वर्षीय भावाला विधिसंघर्षग्रस्त बालक म्हणून निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.राज्य सरकार या मुलीच्या पुनर्वसनासाठी ‘मनोधैर्य’ योजनेसह आवश्यक शासकीय योजनांचा लाभ देईल.तिच्या आरोग्याची आणि पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेईल आणि तिची ओळख सुरक्षित ठेवली जाईल,असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!