Monday, August 31, 2026
Homeमुंबईमंत्र्यांच्या मीटिंगला दांडी; आयएएस अधिकारी निलंबित..

मंत्र्यांच्या मीटिंगला दांडी; आयएएस अधिकारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.तत्पूर्वी तसेच अधिवेशन काळात विविध विभागांच्या बैठकांचा आणि नियोजनाचा धडाका सुरू आहे.या दरम्यान,राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागाशी निगडित धोरणे व धोरणात्मक निर्णय आणि महत्वाच्या मुद्द्यांना अनुसरून एक महत्त्वाची बैठक बोलावली होती.मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव तथा २०११ च्या बॅचचे आयएएस(IAS) अधिकारी एम.देवेंद्र सिंग बैठकीला अनुपस्थित राहिले.मंत्र्यांच्या बैठकीला दांडी मारणे आणि शासकीय कामात कसूर केल्याप्रकरणी आज,शुक्रवार २७ फेब्रुवारीला एम.देवेंद्र सिंग यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाची विधानसभेत दखल घेण्यात आली असून तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे निर्देश दिले होते.त्यानुसार,सामान्य प्रशासन विभागाने एम. देवेंद्र सिंग यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.सनदी अधिकारी म्हणजेच आयएएस अधिकाऱ्याने
मंत्र्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या या थेट कारवाईमुळे सध्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.महाराष्ट्र शासनाने ‘अखिल भारतीय सेवा(शिस्त व अपील) नियम,१९६९’ मधील नियम ३ च्या उपनियम (१) च्या कलम (अ) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम.देवेंद्र सिंग (IAS,२०११ बॅच) यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.या निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय मुंबई येथे निश्चित करण्यात आले असून,कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!