Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरसकाळी वाघाने ठार केले तर सायंकाळी बिबट्याने चिमुकल्याला उचलून नेले.. - चंद्रपूर...

सकाळी वाघाने ठार केले तर सायंकाळी बिबट्याने चिमुकल्याला उचलून नेले.. – चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस; अमूल्य जीवनाची किंमत केवळ पैश्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढलेला असून एक दिवसाआड वाघाच्या हल्ल्यात म्हणा नाहीतर एखाद्या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेला वा गंभीर जखमी झाल्याची कुठली ना कुठली तरी घटना उघडकीस येऊ लागली आहे.आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये केवळ पैसा दिला जात असल्याने मानवांच्या अमूल्य जीवनाची किंमत केवळ पैश्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे.त्यामुळे धर्तीवर केवळ हिंस्त्र प्राण्यांचाच राज चालणार की काय? अशी म्हणण्याची वेळ येऊ नये.काल गुरुवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या असून त्या केवळ हिंस्त्र प्राण्यांच्या उपद्रवाच्याच.सकाळच्या सुमारास एका महिलेस वाघाने ठार केले तर सायंकाळच्या सुमारास बिबट्याने एका आठ वर्षीय चिमुकल्यास उचलून नेत ठार केले.
पहिली घटना चिमूर तालुक्याच्या शंकरपुर पासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या लावारी गावाजवळ काल गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास शेतात काम करणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.सदरची घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली.यात ४० वर्षीय विद्या कैलास मसराम मृत पावली.
दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे काल गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.घरासमोर आपल्या काकासोबत उभा असलेल्या एका आठ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले.प्रशिक बबन मानकर रा.गडबोरी,ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे चिमुकल्याचे नाव आहे.प्रशिक हा आपल्या काका नंदकिशोर मानकर यांच्यासोबत गावातील मस्कऱ्या गणपतीच्या जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी आले.काका थोडे दूर होताच बिबट्याने प्रशिकला तोंडात पकडून टेकडीवरील झुडपात नेले.प्रशिक व बिबट्याचा टेकडी परिसरात शोध घेतला असता प्रशिकचा पॅन्ट व काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले.मात्र,त्याचा पत्ताच लागलेला नव्हता.रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच होती.दोन्ही घटनेने चंद्रपूर जिल्हा हिंस्त्र प्राण्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!