Thursday, April 16, 2026
Homeनागपूरसंपत्तीसाठी सासऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या अर्चना पुट्टेवारला हायकोर्टाचा दणका..!

संपत्तीसाठी सासऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या अर्चना पुट्टेवारला हायकोर्टाचा दणका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गडचिरोलीच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत असणारी ५३ वर्षीय अर्चना मनीष पुट्टेवार हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.सासऱ्याच्या हत्ये प्रकरणी अर्चनाच्या विरोधात विविध ठोस पुरावे आढळून आल्याने तसेच तिने अटक प्रक्रियेवर घेतलेले आक्षेपही निरर्थक आढळल्याने तिला दणका बसला आहे.सरकारच्या वतीने ॲड.नीरज जावडे यांनी बाजू मांडून अर्चनाला जामीन अर्ज मिळू नये,अशी भूमिका घेतली.
  • संपत्ती हातातून जावू नये म्हणून हत्येचा रचला कट 👇
२२ मे २०२४ रोजी नागपुरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पुट्टेवार वय ८२ वर्षे हे सकाळच्या सुमारास फिरायला बाहेर पडले असता त्यांना एका अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती.धडकेत त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.अजनी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती.या घटनेनंतर पुट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.पोलिसांनी जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले होते.पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटिव्हीची पडताळणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कार ड्रायव्हर नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी करण्यात आली.तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला.कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अर्चना पुट्टेवार यांनी पैसे देऊन त्यांच्या सासऱ्यांचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होते.त्यांचा हा खुलासा ऐकुन पोलिसांनाही धक्का बसला होता. त्यानुसार पोलिसांनी सुपारी किलिंग प्रकरणात अर्चना पुट्टेवारसह तिचा भाऊ सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग विभागाचा संचालक प्रशांत पार्लेवार,आर्किटेक्ट पायल नागेश्वर,नीरज निमजे,सचिन धार्मिक व सार्थक बागडे सर्वांना अटक केली.घटना घडली त्यावेळी अर्चना  पुट्टेवार ही गडचिरोली येथील नगररचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत होती.सुरुवातीला सासऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र,एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लानच चौपट झाला.मृतक पुरुषोत्तम यांच्या ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना हिची नजर होती.पुरुषोत्तम हे मुलगी योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे संपत्ती करणार असल्याची कुणकुण अर्चना पुट्टेवारला लागली होती.त्यामुळे संपत्ती हातातून जावू नये; यासाठी तिने हा सगळा कट रचला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!