Saturday, April 18, 2026
Homeमुंबईचिमुकलीचा वाढदिवस साजरा होत असतांनाच कोसळली इमारत; चिमुकलीसह आईचा मृत्यू..

चिमुकलीचा वाढदिवस साजरा होत असतांनाच कोसळली इमारत; चिमुकलीसह आईचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एक वर्षीय चिमुकलीचा वाढदिवस असल्याने घरातील कुटूंबीय आनंदात होते.वाढदिवसाची तयारी झाली आणि वाढदिवस साजरा करणार तितक्याच धाडकन चार मजली इमारतीचा एक भाग कोसळल्याने यात चिमुकलीसह आईचा मृत्यू व अन्य एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारच्या रात्री उशिरा मुंबईतील विरार परिसरात घडली.
विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका एक वर्षीय चिमुकलीचा काल मंगळवारच्या रात्री वाढदिवस साजरा केला जात होता.वाढदिवस साजरा करणार तोच अचानकपणे इमारतीचा एक भाग कोसळल्याने आनंदावर दुःखाचे सावट पसरले.घटनेची माहिती होताच अग्निशमन दल, पोलिस,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ)व स्थानिक प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू असून आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.पाच जणांवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ढिगाऱ्याखाली चिमुकलीच्या वडिलांसह अजून १५ ते २० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.एकीकडे राज्यात गणेशोत्सवाचा आनंद साजरा होत असतांनाच दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!