- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शहरात काळीज हेलावणारी घटना उघडकीस आली आहे.शिकवणी वर्गातून चिमुकल्यांना परत आणायला गेलेल्या आईच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.ऑटोतून खाली उतरल्यावर मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिच्या डोळ्यासमोर सात वर्षीय मुलाला चिरडले अन् फरफटत घेऊन गेला.यात जखमी मुलाचा जागीच मृत्यू झाला अन् क्षणात संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.हिंगणा मार्गावर झालेल्या या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते. आहान सूरज नायक वय ७ वर्षे,श्रमिकनगर,हरिगंगा, एमआयडीसी,नागपूर असे मृत मुलाचे नाव आहे.२७ वर्षीय तुलसी सूरज नायक या त्यांची मुलगी स्नेहा वय ९ वर्षे व आहान यांना रामदासपेठ येथे शिकवणी वर्गातून घेऊन येत होत्या.काल शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ऑटो हिंगणा नाका टी पॉइंट येथे हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावर थांबला.तुलसी या ऑटोचालकाला पैसे देत होत्या व स्नेहा तसेच आहान खाली उतरले होते. त्याचवेळी नागपूरहून हिंगण्याच्या दिशेने एमएच ४० सीआर ५१०० हा ट्रक वेगाने आला.त्याने आहानला जोरात धडक दिली.आहान ट्रकच्या चाकाखाली आला व देशमुख ट्रेडिंग कंपनीच्या समोरून काही अंतरावर ट्रकने त्याला फरफटत नेले.त्यानंतर ट्रकचालक घटनास्थळारून पसार झाला.हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.घटनास्थळावरील लोकांनी आहानकडे धाव घेतली.तर तुलसी यांच्या पायाखालची जमीनच सरकली.लोकांनी आहानला लता मंगेशकर रुग्णालयात नेले.मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली.पोलिसांनी काही अंतरावरून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

