Sunday, August 9, 2026
Homeनागपूरविवाह जोडून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक..

विवाह जोडून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नाशिक स्थित विवाह संस्थेने मोबाइलवर मुलींचे फोटो पाठविले आणि पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरताच संस्थेचे लोक ‘नॉट रिचेबल’ झाले.
नागपूर निवासी ४३ वर्षीय संदीप यांनी याबाबतची तक्रार हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.त्यांच्या तक्रारीनुसार,आईची प्रकृती आणि वय निघून जात असल्याने ते लग्नासाठी प्रयत्न करीत आहेत.दरम्यान,२३ मे रोजी वर्तमानपत्रातील विवाहविषयक या मथळ्याखाली ‘वर पाहिजे’ या जाहिरातीच्या आधारे मुलीच्या वर्णनावरून संदीप यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला.त्यानुसार, नाशिक येथील ‘स्वप्नपूर्ती जोडी डॉट कॉम’ या विवाहसूचक मंडळातून दीपाली मोरे उर्फ शीतल जाधव या महिलेशी संपर्क झाला.त्यांच्या सूचनेनुसार संदीप यांनी मोबाइलवर फोटोसह स्वतःचा बॉयोडाटा पाठविला.
शीतल जाधव या महिलेनेही तीन चार मुलींचे फोटो पाठविले.त्यातील एकीची संदीपने निवड केली.हा संपूर्ण संवाद २४ ते २६ मे पर्यंत चालला.पुढे मुलगी दाखवायचा कार्यक्रम निश्चित करू,पण त्यापूर्वी संस्थेत नोंदणी करावी लागेल,अशी सूचना केली. त्यानुसार,संदीपने २६ मे रोजी ३,००० रुपये फोन पे द्वारे प्रवीण सोनवाने या व्यक्तीच्या नावावर संस्थेच्या खात्यावर पाठविले.पैसे मिळाल्यानंतर एक-दोन तासांत संदीपने पसंत केलेल्या उमरेडला राहणाऱ्या मुलीचा पत्ता पाठवितो, असे सांगितले.हा शेवटचा संवाद.त्यानंतर,त्यांचा फोनच बंद झाला.संदीपने आठवडाभर वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला,पण काही फायदा झाला नाही.तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे संदीपच्या लक्षात आले. आपल्यासारखे असंख्य तरुण विवाहासाठी प्रयत्न करतात.त्यांचीही अशा प्रकारे फसवणूक होत असेल.लोकांना गंडा घालणाऱ्या या रॅकेटवर कारवाई व्हावी,अशी मागणी संदीपने केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!