उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील ‘१०० शाळांना भेटी देणे’ या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा जवळच्या एका शाळेला भेट देण्याचे सूचित केले आहे.शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने लोकप्रतिनिधींच्या भेटीची यादी तयार केली आहे तसे निमंत्रण लोकप्रतिनिधींना दिले जाणार आहे. ‘१०० शाळांना भेटी देणे’ असे उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील किंवा नजीकच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,सोयीसुविधा व गुणवत्तेचा आढावा घ्यावा,असे सूचित करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी नियोजन केले आहे.यात आमदार,खासदार,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य भेट देतील.विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासोबतच यावर्षी प्रथमच शासनाने लोकप्रतिनिधी आणि वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
१०० शाळांना भेटी देणे उपक्रम.. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन आमदार,खासदार करणार स्वागत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

