Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार; मे महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच येणार खात्यात..

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार; मे महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार असून मे महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच खात्यात टाकले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत आढळले होते की,काही सरकारी महिला कर्मचारीही या योजनेचा लाभ घेत आहेत.त्यामुळे अशा लाभार्थींचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता.तरीही,सर्व पात्र महिलांना हप्ता लवकरच दिला जाणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केल्याने राज्यातील लाखो महिलांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे येत्या १० तारखेला वट पौर्णिमेच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण १३ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.मे महिन्याचे लाभ मिळताच एकूण १५ हजार रुपये एका पात्र लाभार्थी महिलेस लाभ होणार आहे.त्यातच एकाच कुटुंबात दोन महिला लाभ घेणाऱ्या असतील तर अश्यांची चांदीच-चांदी म्हणावी लागेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!