Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा क्रीडा संकुलाची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला असून क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव,जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.पाहणीदरम्यान,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय इमारत,व्यायामशाळा, इनडोअर बॅडमिंटन हॉल,स्विमिंग टॅंक आणि डोम टाईप मल्टीगेम इनडोअर हॉल यासारख्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची माहिती घेतली.त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संकुल समितीने कामाची गुणवत्ता तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.यावेळी,इनडोअर बॅडमिंटन हॉलमधील व्हेंटीलेशन तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.पंडा यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेली कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.याप्रसंगी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!